कोबी हा मधुर, वीर्यवर्धक, शीतल, दीपक, पाचक, वातप्रकोपक व कफनाशक आहे. कोबीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व हे घटक जास्त प्रमाणात आहेत तर ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्त्वही थोडय़ा प्रमाणात आहेत. त्याचबरोबर प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थही आहेत.

कोबी हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. गर्भाशय सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे कोबीचे सेवन करावे. तर कोबीची भाजी आवडत नसेल तर भोजनानंतर कोबीचा अर्धा ग्लासभर रस थोडेसे लिंबू पिळून घ्यावा. यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होऊन आरोग्य सुधारते.