शेवग्याची भाजी बनवण्याचे प्रकार अनेक आहेत, आणि हो तो गुणकारी पण आहे. शेवगा ही खाद्य भाजी आहे. शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते. याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शेवग्यातील औषधी गुणांची माहिती आणि काही खास उपाय सांगत आहोत… – शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.
