कारल्याची भाजी – कारले खाण्यास कडू लागते परंतु कारले खूप गुणकारी आहे.

कारल्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, थोड्याप्रमाणत वसा, व्हिटॅमिन ए, सी, आणि इतरही पोषक तत्त्व आढळून येतात. कारले शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास कारले मदत करते. हेच कारलं अनेकांना गंभीर आजारांपासून दूर ठेवू शकते. वजन घटवण्यापासून ते मधुमेह, मुतखड्यासारख्या समस्यांना दूर ठेवण्यापर्यंत कारल्याचा उपयोग होतो.